‘राजस्थान’च्याडगआउटमध्ये मोबाइल?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पराभव केला. सामन्यादरम्यान राजस्थानच्या डगआउटमध्ये मोबाइल फिरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. आयपीएल नियमांनुसार डगआउटमध्ये मोबाइल नेण्यास मनाई आहे. निकाल निश्चिती आणि स्पॉट फिक्सिंग रोखण्यासाठी हा नियम आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरला आहे. राजस्थान रॉयल्स आणि आयपीएल प्रशासनाने अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

mobile controversy in rajasthan royals dugout

नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्सने आयपीएल टी-२० क्रिकेटमध्ये शुक्रवारी रात्री रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा पराभव केला. मात्र, या सामन्याच्या वेळी राजस्थान संघासोबतचे सहाय्यक डगआउटमध्ये मोबाइल घेऊन फिरत असल्याचा व्हिडिओ प्रसारीत झाल्यामुळे वाद सुरू झाला आहे.

आयपीएल टी-२० क्रिकेटमधील निकाल निश्चिती रोखण्यासाठी खेळाडू; तसेच संघासोबतच्या कोणासही डगआउटमध्ये मोबाइल नेण्यास मनाई असते. सामन्यापूर्वी खेळाडू; तसेच सहायकांना आपला मोबाइल सादर करणे आवश्यक असते. निकाल निश्चिती आणि स्पॉट फिक्सिंगची लीगमध्ये चर्चा होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. फलंदाजी सुरू असताना राजस्थान संघाच्या सहायकांपैकी एक व्यक्ती मोबाइल घेऊन डगआउटमध्ये आल्याचे दिसले.

या संदर्भातील क्लीप समाजमाध्यमांवरून प्रसारित होत आहे. दरम्यान, प्रसारित होणारी क्लीप अधिकृत असल्याची खात्री कोणीही दिलेली नाही. राजस्थान रॉयल्सचे संघव्यवस्थापन तसेच आयपीएल प्रशासकीय समितीने अद्याप याबाबत कोणतीही टिपणी केलेली नाही.