एमसीए चॅम्पियन्स स्पर्धा २० एप्रिलपासून

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई क्रिकेट संघटनेने क्लबना मदतीचा हात दिला आहे. १०० कोटी रुपयांचा निधी क्लबच्या विकासासाठी दिला जाईल. यासोबतच, २० एप्रिलपासून एमसीए चॅम्पियन्स करंडक स्पर्धा सुरू होत आहे. ही आठ संघांची स्पर्धा खेळाडूंना टी-२० लीगसाठी संधी देईल. या निर्णयामुळे क्लब स्तरावरील क्रिकेटला नवी दिशा मिळणार आहे.

एमसीए चॅम्पियन्स स्पर्धा २० एप्रिलपासून

मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेने संलग्न क्लबना आर्थिक साह्य करण्यासाठी १०० कोटी रुपये राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेच्या शनिवारी झालेल्या कार्यकारीणी समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. दरम्यान, मुंबई क्रिकेट संघटनेने आठ संघांची चॅम्पियन्स करंडक स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

हा निधी क्लबना क्रिकेट सुविधा तयार करण्यासाठी, नवोदितांना घडवण्यासाठी उपयोगी येईल. त्यामुळे क्लब स्तरावरील क्रिकेटचे भवितव्य सुरक्षित होईल. दरम्यान, या मोसमापासून एमसीए चॅम्पियन्स करंडक स्पर्धा सुरू होईल. ही स्पर्धा आठ संघाची असेल. या स्पर्धेद्वारे मुंबई टी-२० लीगच्या लिलावापूर्वी आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी खेळाडूंना लाभणार आहे. ही चॅम्पियन्स स्पर्धा २० एप्रिलपासून होईल.