यकृत विकारावर आयुर्वेदाची मात्रा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुण्यात एका ६१ वर्षीय महिलेवर हिपॅटायटिस-बी मुळे झालेल्या यकृत विकारावर आयुर्वेदिक उपचार यशस्वी झाले. पोटात साचलेले पाणी पूर्णपणे कमी झाले. भूक वाढली, वेदना आणि अशक्तपणा नाहीसा झाला. रक्त तपासणी अहवालही सामान्य झाले. यकृत प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नाही असे असतानाही हा उपचार प्रभावी ठरला.

miraculous performance of ayurveda in liver disorders

पुणे : हिपॅटायटिस-बी मुळे झालेला गंभीर यकृत विकार आणि पोटात पाणी साचण्याच्या (अॅसाइटिस) या आजारावर आयुर्वेदिक उपचार यशस्वी झाल्याचे समोर आले आहे. पुण्यातील वैद्यांनी ६१ वर्षीय महिला रुग्णावर हे उपचार केले असून, यावर आधारित शोधनिबंध नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ड्रग डिलिव्हरी टेक्नोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. यकृत प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नाही, असे रुग्णाला सांगण्यात आले होते. विनाशस्त्रक्रिया उपचार करता येईल का या शोधात रुग्णाने वैद्य डॉ. मल्हार नेसरी यांच्याकडे उपचार सुरू केले. तपासणीत हिपॅटायटिस-बी आणि यकृताचा दीर्घकालीन आजार असल्याचे निदान झाले. त्यानंतरचार महिने रुग्णावर यकृत शुद्ध करण्याचे आणि शरीराची ताकद वाढवणारे उपचार करण्यात आले. चार महिन्यांनी रुग्णाच्या पोटातील पाणी पूर्णपणे कमी झाले. भूक वाढली, वेदना आणि अशक्तपणा नाहीसा झाला. रक्ततपासणीत बिलीरुबिन आणि यकृताचे अहवालही सामान्य झाले.