‘एनसीईआरटी’ला ‘डीम्ड’चा दर्जा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

देशातील शालेय शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एनसीईआरटीला आता अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे. यामुळे एनसीईआरटीला पदवी अभ्यासक्रम सुरू करता येणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारशीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. संस्थेच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षमतेची दखल घेण्यात आली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत हा निर्णय असून संशोधनाधारित शिक्षणाला चालना मिळेल.

ncert granted deemed university status

पुणे : देशातील शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला ( एनसीईआरटी ) अभिमत (डीम्ड) विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे ‘एनसीईआरटी’ला आता पदवी अभ्यासक्रम सुरू करता येणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) शिफारशीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. हा दर्जा ‘विशेष श्रेणी’ अंतर्गत देण्यात आला असून, संस्थेच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षमतेची दखल घेण्यात आली आहे. ‘एनसीईआरटी’च्या देशभरातील सहा प्रादेशिक संस्थांनाही या दर्जात समाविष्ट करण्यात आले आहे. यामध्ये अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसूर, शिलाँग येथील प्रादेशिक शिक्षण संस्था; तसेच भोपाळमधील केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था यांचा समावेश आहे. हा निर्णय राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी (एनईपी) सुसंगत मानला जात असून, संशोधनाधारित शिक्षण , शिक्षक प्रशिक्षण आणि अभ्यासक्रमातील नवकल्पनांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे.