अमित शहा यांची ‘टीएमसी’वर टीका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेवर आल्यास तृणमूल काँग्रेसचे सिंडिकेट राज संपवण्याचे आश्वासन दिले. राज्यातील महिलांवरील अत्याचारांना जबाबदार असणाऱ्यांना न्यायालयासमोर उभे केले जाईल. घुसखोरांना देशाबाहेर काढले जाईल. बटाटा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला देशभरात बाजारपेठ मिळवून दिली जाईल.

अमित शहा यांची ‘टीएमसी’वर टीका

पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेवर आले; तर तृणमूल काँग्रेसचे ‘सिंडिकेट राज’ संपवू; तसेच राज्यातील महिलांवरील अत्याचारात सहभागी असलेल्यांना न्यायालयासमोर उभे करू, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी भाजपच्या प्रचारसभेत केली. बांकुरा जिल्ह्यातील छतना येथे ही प्रचारसभा पार पडली.

शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळत असल्याचा आरोप केला. ओंदा येथील प्रचारसभेला संबोधताना अमित शहा म्हणाले, ‘भारत ही धर्मशाळा नसून, देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या घुसखोरांना भाजप सत्तेत आल्यावर बाहेर काढले जाईल. बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळावा, यासाठी त्यांचा बटाटा देशभरात पाठवला जाईल, ’ असे आश्वासनही त्यांनी दिले.