जातप्रमाणपत्र घोटाळ्यात आणखी एकाला अटक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

जातप्रमाणपत्र घोटाळ्यात पाचगाव पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. या प्रकरणात आता एकूण सहा जणांना अटक झाली आहे. रितेश मधुसूदन सहारे असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी पाच जणांना अटक करण्यात आली होती. काही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर काही आरोपींची पोलीस कोठडी सुरू आहे. या घोटाळ्याचा तपास पोलीस करत आहेत.

arrest of new accused in caste certificate scam total accused rise to six

नागपूर : जातप्रमाणपत्र घोटाळा प्रकरणात पाचगाव पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. या प्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या आता सहा झाली आहे. रितेश मधुसूदन सहारे (वय ४२, रा. शिवानी अपार्टमेंट, मनीषनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

यापूर्वी पोलिसांनी प्रा. अमोल देवीदास घोडे (वय ३४, नागपूर), साहाय्यक प्राध्यापक शुभम बालाजी खोरगडे (वय ४१), मुकेश बिसनदेव चौबे (वय ४५, रा. सबिना सोसायटी, गोरेवाडा), जगन्नाथ रामा शेरकुरे (वय २२, रा. तास, ता. भिवापूर) व विद्यार्थिनी या पाच जणांना अटक केली होती. चौबे, शेरकुरे व विद्यार्थिनीची पोलिसांनी ११ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी घेतली. पोलिस कोठडी संपल्याने पोलिसांनी तिघांनाही शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीअंतर्गत कारागृहात रवानगी केली. दरम्यान, घोडे, खोरगडे व सहारे या तिघांची १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.