जिल्हा परिषदांद्वारे ‘सीबीएसई’ शाळा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ग्रामीण विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेने पहिली ते बारावीपर्यंतची सीबीएसई शाळा सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या शाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये जागतिक स्तरावर झेप घेण्याची क्षमता निर्माण होईल. महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. भुजबळ यांनी फुले यांच्या विचारांना आदरांजली वाहिली.

inauguration of cbse school for rural students by district council

पान १ वरून

ग्रामीण विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा गाठला असून, सीबीएसईचे पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण देणारी जिल्हा परिषदेची ही पहिलीच शाळा असल्याचे कौतुगोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. या शाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये जागतिक स्तरावर झेप घेण्याची क्षमता निर्माण होत आहे, असे सांगून महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करून, सामाजिक परिवर्तनाच्या विचारांची आठवण करून दिली.

‘महात्मा फुले हे ‘नेशन बिल्डर’ असून, अंधश्रद्धा व विषमतावादी प्रवृत्तीविरोधात त्यांनी लढा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महिला आरक्षणाचा निर्णय हा फुले विचारांना दिलेली खरी आदरांजली आहे,’ अशी भावना भुजबळ यांनी व्यक्त केली.

जयकुमार गोरे यांनी खानवडी येथे फुले यांच्या घराची प्रतिकृती उभारण्याबरोबरच नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्याचा सरकारचा मानस असल्याचे सांगितले.