‘होर्मुझचे अडथळेदूर करण्यास सुरुवात’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळे दूर करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचा दावा केला आहे. चीन, जपान, दक्षिण कोरियासह अनेक देशांच्या हितासाठी ही कारवाई असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इराणने घातलेल्या निर्बंधांमुळे अनेक देशांची तेलकोंडी झाली असली तरी अमेरिकेसाठी ही इष्टापत्ती असल्याचे ट्रम्प यांचे मत आहे. या विधानामुळे मध्यपूर्वेतील तणाव वाढण्याची शक्यता आहे.

inauguration of concerns in hormuz

वॉशिंग्टन : इराणच्या सैन्याचा विध्वंस झाला असून आता होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळे दूर करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी केला. मात्र, होर्मुझमधील सुरुंग हटविण्याकडे ट्रम्प यांचा रोख होता की सामुद्रधुनीच्या व्यापक नियंत्रणाला उद्देशून त्यांनी हे वक्तव्य केले, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशलच्या पोस्टवर नमूद केले आहे की, अमेरिका विविध देशांच्या हितासाठी ही कारवाई करत असल्याचे म्हटले आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स, जर्मनी आणि इतर अनेक देशांच्या फायद्यासाठी आम्ही होर्मुझ सामुद्रधुनी मोकळी करण्यास सुरुवात केली आहे. आश्चर्य म्हणजे, हे देश स्वतः ही जबाबदारी पार पाडण्याची हिंमत दाखवत नाहीत’, असे त्यांनी नमूद केले. या विधानामुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त आहे.

इराणने होर्मुझमधील वाहतुकीवर निर्बंध घातल्याने अनेक देशांची तेलकोंडी झाली असली तरी डोनाल्ड ट्रम्प यांना मात्र ही अमेरिकेसाठी इष्टापत्ती असल्याचे वाटत आहे. त्यांनी नुकत्याच त्यांच्या ट्रुथ सोशल या माध्यमावर तसे नमूद केले आहे.