तेहरान : अमेरिका- इराण यांच्यातील चर्चेसाठी इस्लामाबादला जाणाऱ्या इराणच्या शिष्टमंडळाने आपल्यासोबत या विमानात रक्ताने माखलेली शाळेची दप्तरे, बूट, पांढरी फुले आणि मृत्युमुखी पडलेल्या मुलांची छायाचित्रे घेऊन प्रवास केला. इराणच्या दूतावासाने विमानाच्या केबिनचा व्हिडिओ शेअर करताना, मिनाब येथील शाळेवर झालेल्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या १६८ विद्यार्थ्यांचे स्मरण करतानाच, अमेरिकेला कडक; पण भावनिक संदेश दिला. इराणच्या शिष्टमंडळाला ‘मिनाब १६८’ असे नाव देण्यात आले आहे. २८ फेब्रुवारी रोजी इराणच्या दक्षिणेकडील मिनाब येथील शाळेवर हल्ला झाला. इराणच्या दूतावासानेही हेच छायाचित्र शेअर करत, ‘मिनाबची मुले सदैव आमच्यासोबत आहेत,’ असे म्हटले.



