गोठवलेल्या संपत्तीचा मुद्दा केंद्रस्थानी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

इस्लामाबादमध्ये अमेरिका, इराण आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेने गोठवलेली इराणची सहाशे कोटी डॉलरची संपत्ती मुक्त करण्यावर चर्चा होत आहे. दुसरीकडे, इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील थेट चर्चा पुढील मंगळवारपासून वॉशिंग्टन येथे सुरू होणार आहे. भारतीय जहाज 'जग विक्रम'ने होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली आहे.

israel lebanon dialogue and americas discussion on frozen iranian assets

बैरूत : इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील थेट चर्चा पुढील मंगळवारपासून सुरू होणार असल्याची माहिती लेबनॉनचे अध्यक्ष जोसेफ आऊन यांनी दिली. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या मध्यस्थीने वॉशिंग्टन येथे ही चर्चा होणार आहे. लेबनॉनच्या विनंतीनंतर इस्रायलने गुरुवारी थेट चर्चेला मंजुरी दिल्याची घोषणा केली, मात्र यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

बैरूत : इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील थेट चर्चा पुढील मंगळवारपासून सुरू होणार असल्याची माहिती लेबनॉनचे अध्यक्ष जोसेफ आऊन यांनी दिली. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या मध्यस्थीने वॉशिंग्टन येथे ही चर्चा होणार आहे. लेबनॉनच्या विनंतीनंतर इस्रायलने गुरुवारी थेट चर्चेला मंजुरी दिल्याची घोषणा केली, मात्र यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

अमेरिका-इराण युद्धसमाप्तीच्या दिशेने एक पाऊल म्हणून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये अमेरिका, इराण व पाकिस्तानी अधिकाऱ्यांमध्ये शनिवारी चर्चा सुरू झाली. या चर्चेच्या केंद्रस्थानी मुख्य मुद्दा होता तो म्हणजे, अमेरिकेने गोठवलेल्या इराणच्या संपत्तीचा. ही संपत्ती खुली करण्यास अमेरिकेने सहमती दर्शवल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले, मात्र अमेरिकेने या वृत्ताचा इन्कार केला आहे.

इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेला सांगितले की, कतार आणि इतर विदेशी बँकांमध्ये गोठवलेली इराणची सहाशे कोटी डॉलरची संपत्ती मुक्त करण्यास अमेरिकेने सहमती दर्शवली आहे. दरम्यान, हे वृत्त अमेरिकेने फेटाळून लावले. ही संपत्ती सहाशे कोटी डॉलर इतकी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षीय कार्यकाळात अमेरिकेने इराणसोबतच्या अणुकरारातून माघार घेत इराणवर पुन्हा निर्बंध लादल्यानंतर २०१८मध्ये हा निधी प्रथम गोठवण्यात आला होता. हा पैसा इराणने दक्षिण कोरियाला केलेल्या तेलविक्रीतून आला होता आणि तो दक्षिण कोरियाच्या बँकांमध्ये ठेवण्यात आला होता. २०२३मध्ये दोन देशांमधील कैद्यांच्या अदलाबदल कराराचा भाग म्हणून हा निधी कतारमधील बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला.

दरम्यान, चर्चेसाठी अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स इस्लामाबादला येत असताना, पाकिस्तानी हवाई दलाच्या एफ-१६ लढाऊ विमानांनी त्यांच्या विमानाला आकाशात सुरक्षा प्रदान केली.

‘जग विक्रम’ने हॉर्मुझपार

नवी दिल्ली : एनपीजीवाहू ‘जग विक्रम’ या भारतीय जहाजाने शुक्रवार रात्र आणि शनिवार सकाळ या दरम्यान होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली आहे. युद्धविरामाच्या घोषणेनंतर होर्मुझ ओलांडणारे ते पहिले भारतीय जहाज आहे. मुंबई स्थित ग्रेट इस्टर्न शिपिंग कंपनीच्या या जहाजात २० हजार टन एलपीजी असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.