संजूचा शतकी झंझावात

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

संजू सॅमसनने आयपीएलच्या नव्या मोसमातील पहिले शतक ठोकले. त्याच्या शानदार खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २० षटकांत २१२ धावांचा डोंगर उभारला. सॅमसन आणि आयुष म्हात्रे यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे चेन्नईने मोठे लक्ष्य ठेवले. चेन्नईने मोसमातील प्रथमच द्विशतकी धावसंख्या गाठली.

संजूचा शतकी झंझावात

मोसमादरम्यानचा आपल्या खरेदीचा चेन्नई सुपर किंग्ज संघव्यवस्थापनाचा निर्णय योग्य होता हे संजू सॅमसनने शनिवारी दाखवले. त्याने आयपीएल टी-२० क्रिकेटच्या नव्या मोसमातील पहिला शतकवीर होण्याचा मान मिळवला, त्याचबरोबर चेन्नई संघाने मोसमात प्रथमच द्विशतकी धावाही केल्या. सॅमसन आणि आयुश म्हात्रेच्या फटकेबाजीमुळे ‘चेन्नई’ने दिल्ली कॅपिटल्सला २० षटकांत २१२ धावांचा चोप दिला.

कर्णधार ऋतुराज गायकवाडला पॉवरप्लेमध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागला. मात्र संजूला आयुषने चांगली साथ दिली. धावगती उंचावण्यासाठी आयुषला बाद करण्य़ात आले, मात्र त्यापूर्वी संजू आणि आयुषने ६७ चेंडूंत ११३ धावा केल्या होत्या. त्यात संजूचा वाटा ३१ चेंडूतील ५२ धावांचा होता, तर आयुषचा ३६ चेंडूतील ५९चा. अखेरच्या १५ चेंडूत शिवम दुबे आणि संजूने ३७ धावांचा चोप देत ‘चेन्नई’ला सहज दोनशेच्या पार नेले. अर्थात ‘चेन्नई’ला अखेरच्या पाच षटकांत आपण ४४ धावाच करू शकलो हे सलत असेल.

ऋतुराज संथ असल्यामुळे पॉवरप्लेमध्ये ६१ धावाच झाल्या. त्याची भरपाई आयुश आणि संजूने डावाच्या मधल्या ९ षटकांत १०७ धावा करून केली. ‘चेन्नई’ने ९ षटकार आणि २१ चौकारांचा चोप दिला. त्यातील १५ चौकार व ३ षटकार संजूचे होते. अर्थात त्याने तसेच आयुषने ‘दिल्ली’च्या खराब क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा घेतला.

स्कोअरबोर्ड ः चेन्नई सुपर किंग्ज २ बाद २१२ ( संजू सॅमसन नाबाद ११५ - ५६ चेंडूंत १५ चौकार व ४ षटकार, ऋतुराज गायकवाड १५, आयुष म्हात्रे ५९ - ३६ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकार, शिवम दुबे नाबाद २० - १० चेंडूंत २ चौकार व १ षटकार, अक्षर पटेल ४-०-३९-१, टी. नटराजन ४-०-५४-०, लुंगी एन्गीडी ४-०-४१-०) वि. दिल्ली कॅपिटल्स .