तांदळाच्या व्यापाऱ्याला २० लाखांनी गंडा घालण्यात आला. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
प्रशांत जर्नादन उराडे, भास्कर रामदास उराडे, वैशाली भास्कर उराडे, दर्शना नितीनराव उराडे व रितेश बाळाजी घमलाखे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पीयूष राजकुमार दिवाण (वय ३२, रा. देशपांडे लेआउट, वर्धमाननगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. पीयूष यांची कच्छी विसा मैदान परिसरात सनराइज ॲग्रो यूजी कंपनी असून ते तांदळाचे ठोक व्यापारी आहेत. पाच जणांची ब्रह्मपुरीतील खरबी येथे श्री साईलीला स्टीम्स नावाची राइस मिल आहे. ६ नोव्हेंबरला पीयूष यांनी पाच जणांसोबत ४ हजार १५० रुपये दराने पाचशे क्विंटल तांदूळ खरेदीचा व्यवहार केला.



