ऑफिस बॉयकडून विद्यार्थ्यावर अत्याचार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात एका नामांकित शिकवणी वर्गातील ऑफिस बॉयने बारा वर्षांच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केला. जानेवारीपासून हा प्रकार सुरू होता. मुलाच्या वागण्यातील बदलामुळे पालकांना संशय आला. मुलाने सर्व प्रकार सांगितल्यावर पालकांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

sexual assault by office boy on student

पुणे : नामांकित खासगी शिकवणी वर्गाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने बारा वर्षांच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना मार्केट यार्ड परिसरात घडली. या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण असून, पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

या प्रकरणी ३५ वर्षीय आरोपीविरोधात लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत ४५ वर्षीय व्यक्तीने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदारांचा मुलगा इयत्ता आठवीत शिकत असून, तो गेल्या दोन-तीन वर्षांपासून एका क्लासमध्ये जात होता. आरोपी या क्लासमध्ये ‘ ऑफिस बॉय ’ म्हणून काम करतो. त्याने जानेवारी महिन्यापासून या मुलावर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थी तणावाखाली होता. मुलाचे बदललेले वागणे आणि चेहऱ्यावरील भीती पाहून वडिलांना संशय आला. त्यांनी विचारपूस केली असता, मुलाने हा प्रकार सांगितला. त्यामुळे हादरलेल्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली.