पुणे : बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना शिवसंग्राम पक्ष पाठिंबा देणार असल्याची माहिती ‘शिवसंग्राम’च्या अध्यक्षा डॉ. ज्योती मेटे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
शिवसंग्रामचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेटे यांच्यातील ऋणानुबंध हे केवळ राजकीय नव्हते; तर वैचारिक आणि सामाजिक पातळीवरही अतूट होते. त्या नात्याचा मान राखून पाठिंबा देण्यात येत असल्याचेही मेटे यांनी सांगितले.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी नावाची चर्चा असल्याबाबत विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘प्रशासकीय अधिकारी म्हणून मी अनेक वर्षे काम केले आहे. भविष्यात संधी मिळाल्यास महिला अध्यक्षपदावर काम करण्याची इच्छा आहे. ‘एनसीईआरटी’च्या पुस् तकातून मराठा साम्राज्याचा इतिहास पुसणे गंभीर आणि आक्षेपार्ह घटना आहे,’ असेही त्या म्हणाल्या.



