अहिल्यानगर : जामखेड तालुक्यात एका साडेतेरावर्षीय मुलीवर तिचा पिता आणि एका हॉटेल चालकाने अत्याचार केला. यातून ती मुलगी तीन महिन्यांची गर्भवती आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांना नराधम पिता आणि हॉटेलचालकाला अटक केली आहे. आश्रमशाळेत केलेल्या वैद्यकीय तपासणीतून हा प्रकार उघडकीस आला.
ही मुलगी आणि कुटुंबीय मूळचे संगमनेर तालुक्यातील असून, तिचे कुटुंबीय सध्या ऊसतोडणीच्या कामासाठी जामखेड तालुक्यात आले आहेत. तिच्या आईचे निधन झाले आहे. मुलगी आश्रमशाळेत शिकते.







