भीषण वास्तवाची रहस्यमय शोधकहाणी ‘सालबर्डी’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

येत्या १७ एप्रिलला 'सालबर्डी' हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात पीआय मनोरमा प्रधान एका अनाकलनीय रहस्याचा शोध घेताना दिसणार आहे. पूजा सावंत पीआय मनोरमा प्रधानची भूमिका साकारत आहे. शशांक शेंडे, ओंकार भोजने यांसारखे कलाकारही यात आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना भय आणि रहस्याच्या प्रवासावर घेऊन जाईल.

भीषण वास्तवाची रहस्यमय शोधकहाणी ‘सालबर्डी’

ही प्रश्नांची उत्तरं नसतात आणि काही उत्तरं आणखी प्रश्न निर्माण करतात. ‘सालबर्डी’ एक असं गाव; जिथं घडणाऱ्या काही घटनांमागे एक अनाकलनीय रहस्य दडलेलं आहे. या गावात घडणाऱ्या विचित्र घटनांचा तपास करताना ‘ पीआय मनोरमा प्रधान ’ एका सत्याच्या जवळ पोहोचते; जे केवळ धक्कादायकच नाही, तर अत्यंत अस्वस्थ करणारं आहे. ‘नेब्यूला फिल्म्स’ निर्मित आणि रमेश साहेबराव चौधरी दिग्दर्शित ‘सालबर्डी’ हा मराठी चित्रपट येत्या १७ एप्रिलपासून प्रेक्षकांना भय आणि रहस्याच्या एका वेगळ्या प्रवासाला घेऊन जाणार आहे.

अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी ‘सालबर्डी’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.

‘सालबर्डी’ गावात जे घडतंय; ते सामान्य नाही. तपास जसजसा पुढं सरकतो; तसं एक वास्तव उलगडतं, जे कल्पनेपलीकडचं आहे. ‘सालबर्डी’ मध्ये अभिनेत्री पूजा सावंत पोलिसांच्या वर्दीत झळकणार असून, गुन्ह्यांच्या गुंतागुंतीत शिरून सत्याचा शोध घेणारी तिची पीआय मनोरमा प्रधान ही भूमिका चित्रपटाच्या कथानकाला एक वेगळीच धार देणार आहे. पूजा सावंतसोबत शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर यांसारखी दमदार कलाकारांची फळी या कथेला अधिक प्रभावी करणार आहे.

सशक्त कलाकार, प्रभावी दिग्दर्शन आणि कथेला पूरक संगीत; यामुळे ‘सालबर्डी’ एक सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. १७ एप्रिलपासून हा थरार अनुभवण्यासाठी तयार राहा!