विधानसभा निवडणुकीत आणि त्यापाठोपाठ झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाच्या वाट्याला अपयश आल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फेरबदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षसंघटनेत प्राण फुंकण्यासाठी युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवायची का, याविषयी पक्षाच्या नेतृत्वाकडून गंभीर विचार सुरू असल्याचे समजते.
शिवसेना भवनात होणाऱ्या जिल्हाप्रमुख आणि विभागप्रमुखांच्या बैठकांना नियमित उपस्थित राहताना आदित्य यांनी संघटनेवरील पकड मजबूत करण्यावर भर दिल्याचे दिसते. त्यांच्यावर कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी लगेच सोपवायची, की सार्वत्रिक निवडणुकांच्या आधी वर्षभर याविषयी अद्याप काही ठरलेले नाही.







