अचलपुरात आरोपीच्या घरावर बुलडोझर

महाराष्ट्र टाइम्स

अचलपूरमध्ये लैंगिक शोषणाच्या आरोपातील मुख्य आरोपी अयान अहमदच्या घरावरील बेकायदा बांधकामावर बुलडोझर चालवण्यात आला. पोलिसांनी अयानसह त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. तपासात आरोपींनी आठ अल्पवयीन मुली आणि महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने डिलीट केलेला डेटा परत मिळवण्याचे काम सुरू आहे.

bulldozer action on accuseds house in akola sexual exploitation case

या प्रकरणात आता धक्कादायक बाबी बाहेर येत आहेत. मुख्य आरोपी अयान अहमद याच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याच्या तीन साथीदारांनाही जेरबंद केले आहे. तपासादरम्यान आरोपींनी आठ अल्पवयीन मुली आणि महिलांचे १८ व्हिडिओ व ३९ फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे समोर आले आहे. यामध्ये काही मुस्लिम तरुणींचाही समावेश आहे.

अचलपूर -परतवाडा या जुळ्या शहरांसह संपूर्ण अमरावती जिल्हा हादरवून सोडणाऱ्या आक्षेपार्ह व्हिडिओ आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य संशयित अयान अहमद याच्या अचलपूर येथील घरातील बेकायदा बांधकामावर बुधवारी नगर परिषदेने हातोडा मारला. चोख पोलिस बंदोबस्तात ही बुलडोझर कारवाई करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे लक्षात घेता ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.

अचलपूर नगरपरिषदेचे पथक बुधवारी दुपारी जेसीबी आणि बुलडोझर घेऊन लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान अहमद याच्या घरासमोर दाखल झाले. घराचे सर्वेक्षण केल्यानंतर काही भाग अतिक्रमित असल्याचे समोर आले. त्या संदर्भात प्रशासनाने आधीच नोटीस बजावली होती. कारवाईदरम्यान घराच्या बाजूला असलेला लोखंडी जिना आणि अतिक्रमित बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. या वेळी स्थानिक नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी विशेष तपास पथक स्थापन केले आहे.

आरोपीच्या मोबाइलमधून मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह डेटा जप्त करण्यात आला आहे. अटक टाळण्यासाठी किंवा पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मोबाइलमधील माहिती डिलीट केली होती. मात्र, सायबर तज्ज्ञांच्या मदतीने हा डेटा पुन्हा मिळवण्याचे काम सुरू आहे.