मध्यरात्री महामार्गावर दाम्पत्याला उतरवले

Contributed byपुणे|महाराष्ट्र टाइम्स

कोल्हापूरहून पुण्याला जाणाऱ्या ई-शिवाई बसमध्ये चालकाने गैरवर्तन केले. धोकादायक वाहन चालवणे, सतत हॉर्न वाजवणे आणि उद्धटपणे बोलणे यामुळे प्रवाशांना त्रास झाला. एका प्रवाशाने जाब विचारल्यावर एका दाम्पत्याला कराडजवळ मध्यरात्री महामार्गावर उतरवले गेले. एसटी प्रशासनाने चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले आहे.

couple dropped off at midnight from bus due to drivers misconduct

कोल्हापूरहून पुण्याकडे येणाऱ्या ई-शिवाई बसमधील चालकाच्या गैरवर्तनामुळे प्रवाशांना धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रवासादरम्यान चालकाने धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे, सतत हॉर्न वाजवणे आणि प्रवाशांशी उद्धटपणे वागणे असे प्रकार केल्याने तणाव निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर एका प्रवाशाने जाब विचारल्यामुळे संबंधित दाम्पत्याला कराडजवळ मध्यरात्री महामार्गावर उतरवण्यात आल्याची गंभीर घटना घडली.

बसचालकाकडून प्रवासादरम्यान अश्लील भाषेत बोलणे, वेडीवाकडी वळणे घेणे, असे प्रकार सुरू होते.

या घटनेबाबत प्रवाशांनी नापसंती व्यक्त केली असली; तरी एसटी प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

या प्रकरणी चौकशी करून संबंधित चालकावर कारवाई केली जाईल, असे पुणे एसटी विभागाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले.