आजच्याच तारखेला १८५३ मध्ये देशात पहिली प्रवासी रेल्वे धावली होती. मुंबईतील बोरीबंदर ते ठाणे दरम्यान हा ऐतिहासिक प्रवास झाला होता. यात वाफेवर चालणारी तीन इंजिने होती. गाडीला एकूण चौदा डबे होते आणि सुमारे चारशे प्रवाशांनी ३४ किलोमीटरचे अंतर पार केले होते. या यात्रेमुळे भारतात रेल्वेने नवी सुरुवात केली. पुढे रेल्वे व्यवस्था देशाची जीवनरेखा बनली. आज देशातील सुमारे ९९ टक्के रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण झाले आहे.
पादचाऱ्यांमुळे वाहतूककोंडी?
कर्नाटकातील बेंगळुरूमधील एका स्टार्टअप प्रणेत्याने मांडलेल्या मतामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. त्यावर काही जणांनी सहमती दर्शविली तर इतरांनी विरोध दर्शविला. मार्ग तयार करताना पादचाऱ्यांचा विचार केला जात नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.







