महापालिका सीबीएसई शाळांचा निकाल ९२.८९ टक्के

महाराष्ट्र टाइम्स

मुंबई महापालिकेच्या सीबीएसई शाळांनी दहावी परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. एकूण ९२.८९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलुंड मिठागर शाळेतील आर्या लामनेने सर्वाधिक ९७.८ टक्के गुण मिळवले. अंधेरी पुनमनगर, घाटकोपर राजावाडी आणि मुलुंड मिठागर येथील विद्यार्थ्यांनीही चांगले यश मिळवले आहे. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे हे यश कौतुकास्पद आहे.

mumbai municipal corporation cbse school result 9289 percent

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) संलग्न ११ शाळांच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत मुंबई महापालिकेच्या शाळांचा एकूण निकाल ९२.८९ टक्के इतका लागला आहे.

महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या सीबीएसई संलग्न ११ शाळांमधून एकूण ३३९ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. मुलुंड मिठागर सीबीएसई शाळेतील कुमारी आर्या लामने या विद्यार्थिनीने ९७.८ टक्के गुण मिळवून महापालिकेच्या शाळांतून प्रथम येण्याचा मान मिळवला. तसेच महापालिकेच्या अंधेरी पुनमनगर शाळेतील सौरभ यादव (९७.२ टक्के), घाटकोपर राजावाडी शाळेतील कौस्तुभ त्रिपाठी (९७ टक्के), पुनमनगर शाळेतील आर्यन मयेकर (९६.६ टक्के) आणि श्रेया सिंग (९६.४ टक्के), मुलुंड मिठानगर शाळेतील माही सोळंकी (९६.२ टक्के) या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण मिळवले.