‘सुखना’तील अतिक्रमण हटवले

महाराष्ट्र टाइम्स

चिकलठाणा झोन क्रमांक ५ मधील सुखना नदी पात्रातील ८५ कच्ची व पक्की अतिक्रमणे महापालिकेने हटवली. आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशाने ही कारवाई झाली. अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे आणि उपायुक्त सविता सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. या मोहिमेत अनेक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. नदीचे पात्र मोकळे करण्यात आले.

‘सुखना’तील अतिक्रमण हटवले
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

चिकलठाणा झोन क्रमांक ५ अंतर्गत येणाऱ्या सुखना नदीच्या पात्रातील ८५ कच्ची आणि पक्की अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने पाडली.

आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे आणि उपायुक्त सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत सहायक आयुक्त संजय सुरडकर, इमारत निरीक्षक प्राप्ती जाधव , गणेश वीर, रवींद्र देसाई , सागर श्रेष्ठ , संदीप कानकाटे, जेसीबी वाहन चालक दराडे , नागरी मित्र पथकाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.