‘विकासकामांचा दर्जा निकृष्ट’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या बैठकीत पंढरपूर गटातील विकासकामांच्या निकृष्ट दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. अनेक कामे अपूर्ण असून काही संथ गतीने सुरू आहेत. निधीचा वापरही पूर्ण क्षमतेने होत नसल्याचे समोर आले आहे. पीक नुकसानभरपाईची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची मागणीही करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

quality of development works in pandharpur block poor concern expressed by vidya gaikwad

छत्रपती संभाजीनगर : पंचायत समिती अंतर्गत पंढरपूर गटात विकासकामे सुरू आहेत. अनेक कामे पूर्ण झाली नाहीत, काही कामे संथ गतीने सुरू आहेत, कामाचा दर्जा निकृष्ट आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी स्थळपाहणी करुन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पंढरपूर जिल्हा परिषद गटाच्या सदस्य विद्या रमेश गायकवाड यांनी केली.

छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीची आढावा बैठक नुकतीच झाली. तीत विद्या गायकवाड यांनी पंढरपूर गट तसेच तालुक्यातील अडचणी मांडल्या. निधी वापरात त्रुटी आहेत. १५ वा वित्र आयोग, दलितवस्ती सुधार योजना व अन्य योजनांमधील निधी पूर्ण क्षमतेने वापरला जात नाही. पीक नुकसानभरपाईची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत आदी मागण्या त्यांनी मांडल्या.