‘फुले भीमोत्सव’चे अध्यक्ष डॉ. गव्हाणे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

छत्रपती संभाजीनगर येथे फुले भीमोत्सव २०२६ समितीची कार्यकारिणी निवडण्यात आली. डॉ. सुधीर गव्हाणे यांची अध्यक्षपदी तर माजी आमदार एम. एम. शेख यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली. डॉ. अरुण शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. या निवडीमुळे आगामी उत्सवाच्या आयोजनाला गती मिळणार आहे.

dr gawane elected as president of phule bhimotsav 2026 committee

छत्रपती संभाजीनगर : ‘ फुले भीमोत्सव २०२६’ समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सुधीर गव्हाणे , कार्याध्यक्षपदी माजी आमदार एम. एम. शेख यांची निवड झाली. मुख्य आयोजक डॉ. अरुण शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत कार्यकारिणी निवडली. उर्वरित कार्यकारिणी : स्वागताध्यक्ष विनोद कांबळे, सचिव आर. आर. मोढेकर, सहसचिव पद्माकर कांबळे, भगतराज भालेराव, अमोल सरदार, अनिस पटेल, आनंद दाभाडे, मोहिनी इनामदार, रवी लोखंडे, मंजू लोखंडे, अनिता भंडारी, विद्या घोरपडे, सरोज जेकब, राजू गवई, ज्ञानेश्वर माने, निखिल वाघ, विजय गायकवाड, शैलेश झणके, सुनील शिरसाट, शीलवंत गोपनारायण, संजय धर्मरक्षक, मिलिंद आठवले, आनंद दाभाडेे