सोशल मीडिया व्यासपीठांना सूचना

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सायबर पोलिसांनी सोशल मीडिया कंपन्यांना आर्थिक फसवणूक करणाऱ्या रील हटवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला होणारा धोका टाळता येईल. अशा प्रकारची सामग्री पसरवणाऱ्या खातेधारकांची माहितीही मागवण्यात आली आहे. सायबर महाराष्ट्राच्या प्रवक्त्याने या कारवाईची माहिती दिली आहे. नागरिकांनी सावध राहावे.

economic threat on social media important notice from cyber police

सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक नुकसान आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला होणारा संभाव्य धोका ओळखून सायबर पोलिसांनी सोशल मीडिया व्यासपीठांना याबाबत कळवले आहे. अशा रील हटवण्यात याव्यात आणि अशा प्रकारचे साहित्य पसरवणाऱ्या खातेधारकांची माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या व्यासपीठांकडे करण्यात आली असल्याचे सायबर महाराष्ट्रच्या प्रवक्त्याने सांगितले.