‘काम नाही, तर पद नाही’

महाराष्ट्र टाइम्स

शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याचे निर्देश दिले. पक्षवाढीसाठी तळागाळातील शिवसैनिकांपर्यंत पोहोचण्यास सांगितले. काम दिसले नाही तर पद राहणार नाही असा इशारा दिला. निवडणुका संपल्या असून आता पक्षवाढीचा हंगाम सुरू झाला आहे.

eknath shindes strict orders to shiv sena mps

‘निवडणुका संपल्या असून, आता पक्षवाढीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यात शिवसेनेला बळकट करण्यासाठी तळागाळातील शिवसैनिकांपर्यंत पोहोचा. जनतेच्या प्रश्नांवर तत्परतेने काम करा आणि पक्षवाढीसाठी योगदान द्या’, अशा स्पष्ट सूचना शिवसेनेचे मुख्य नेते, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पक्षाच्या आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना दिल्या. ‘काम दिसले नाही, तर पद राहणार नाही’, असा इशाराही त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिला.