बनावट नोटांद्वारे पैसे दुप्पट

महाराष्ट्र टाइम्स

सोशल मीडियावर बनावट नोटा दाखवून पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवले जात आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी यावर गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरात चार गुन्हे दाखल झाले आहेत. राहुल पवार आणि योगिता भोसले या दोघांना अटक करण्यात आली आहे. बनावट नोटा चलनात आणणे अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक आहे. पोलिसांनी या रील बनवणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे.

fake notes scam to double money exposed

सर्वसामान्य नागरिकांना पैसे दुप्पट, तिप्पट करण्याचे प्रलोभन दाखवण्यासाठी बनावट नोटांचा वापर करून सोशल मीडियावर रील तयार केल्या जात आहेत. याची गंभीर दखल महाराष्ट्र सायबरच्या वतीने घेण्यात आली असून, याप्रकरणी राज्यभरात आत्तापर्यंत चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, पोलिसांनी दोघांना अटक केली असून, यामध्ये एका महिलेचा समावेश आहे.

इन्स्टाग्राम, तसेच इतर सोशल मीडिया व्यासपीठांद्वारे पैसे दुप्पट, तिप्पट करून देतो, असे प्रलोभन दाखवत नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार सुरू आहेत. नागरिकांचा विश्वास बसावा यासाठी ही मंडळी पैसे दुप्पट, तिप्पट करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवणारे व्हिडीओ पोस्ट करतात. यासाठी व्हिडीओमध्ये बनावट नोटा ंचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले. याची गंभीर दखल महाराष्ट्र सायबर पोलिसांनी घेतली आहे. पैसे दुप्पट, तिप्पट करून देताना बनावट नोटा चलनात आणल्यास हा अर्थव्यवस्थेला धोका ठरू शकतो. त्यामुळे पोलिसांनी या रील बनवणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली असल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली.

याप्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील दोन गुन्हे मुख्यालयात, तर बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या फसवणुकीबद्दल एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. राहुल पवार आआणि योगिता भोसले अशी त्यांची नावे आहेत.