स्वमग्नांच्या पालकांसाठी शिबिर

महाराष्ट्र टाइम्स

स्वयंसिद्ध संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ऑटिझम पाल्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. हे शिबिर १२ एप्रिल रोजी सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात होणार आहे. यात पालकांना आणि विशेष शिक्षकांना मार्गदर्शन मिळेल. सहभागी होणाऱ्यांना एक विशेष कीटही दिले जाईल. दहा एप्रिलपर्यंत नोंदणी आवश्यक आहे.

free training camp for parents of autism spectrum children

शहरातील स्वयंसिद्ध मतिमंद मुलांसाठीच्या मातृपालक संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून फोरम फाॅर ऑटिझम ( मुंबई ), स्वयंसिद्ध संस्था, सक्षम तसेच सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने रविवारी (१२ एप्रिल) स्वमग्न (ऑटिझम) पाल्यांचे पालक आणि विशेष शिक्षक यांच्यासाठी एक दिवसीय नि:शुल्क प्रशिक्षण शिबिर होणार आहे.

हे शिबिर खोली क्रमांक १५३, सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय येथे सकाळी १० ते दुपारी एक या वेळेत होईल. शिबिरात सहभागी होणाऱ्या पालकांना एक विशेष कीट देण्यात येणार आहे. इच्छुकांनी दहा एप्रिलपर्यंत कमलेश भाले किंवा पंकज कांबळे यांच्याकडे नोंदणी करावी. नोंदणी करतांना पालकांनी आपले नाव, पाल्याचे नाव, मोबाइल नंबर, तर विशेष शिक्षक यांनी नाव व मोबाईल नंबर नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.