आसाम, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये नव्या विधानसभेसाठी आज, गुरुवारी मतदान पार पडेल. यासाठी निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली आहे.
या टप्प्यात आसाममधील १२६, केरळमधील १४० आणि पुदुच्चेरीमधील ३० जागांसाठी मतदान होईल. आज, गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू होईल. तमिळनाडूमध्ये २३ एप्रिल रोजी, तर पश्चिम बंगालमध्ये २३ आणि २९ एप्रिल रोजी मतदान होईल आणि चार मे रोजी मतमोजणी होईल. केरळमध्ये ८८३ उमेदवारांचे भवितव्य २.६ कोटींहून अधिक मतदार, आसाममध्ये २.५ कोटी मतदार ७२२ उमेदवारांचे आणि पुदुच्चेरीत १० लाख १४ हजार ७० मतदार आहेत.
संबंधित वृत्त... फ्रंट पेज २



