‘कॉप ३३’चा प्रस्तावभारताकडून मागे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भारताने २०२८ मध्ये होणाऱ्या 'कॉप ३३' हवामान परिषदेचे यजमानपद स्वीकारण्याचा प्रस्ताव मागे घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुबईत झालेल्या 'कॉप २८' परिषदेत हा प्रस्ताव मांडला होता. या निर्णयाची माहिती संबंधितांना अधिकृतपणे देण्यात आली आहे. दरम्यान, भारत-अमेरिका व्यापार वाढवण्यासाठी नवी वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. तसेच, निवडणूक आयोगासोबत तृणमूल काँग्रेसची वादळी बैठक झाली.

india withdraws proposal for cop 33

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक हवामान परिषदेच्या ( कॉप ३३ ) २०२८ मध्ये होणाऱ्या बैठकीच्या आयोजनाचा प्रस्ताव भारताने बुधवारी मागे घेतला. सन २०२३मध्ये दुबईत झालेल्या ‘ कॉप २८ ’ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कॉप ३३’चे यजमानपद भारताला देण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, यजमानपद स्वीकारण्याचा प्रस्ताव भारत मागे घेत असल्याचे संबंधितांना अधिकृतपणे कळवण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

व्यापारासाठी वेबसाइट

वॉशिंग्टन : परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बुधवारी येथे भारत-अमेरिका व्यापार साह्य वेबसाइट लाँच केली. दोन्ही देशांतील व्यापार ५०० अब्ज डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून ही वेबसाइट विकसित करण्यात आली आहे. मिस्री तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.

वाद विकोपास

कोलकाता : निवडणूक आयोगाचे पूर्ण पीठ आणि तृणमूल काँग्रेसचे शिष्टमंडळ यांच्यात बुधवारी दिल्लीत झालेली जेमतेम पाच-सात मिनिटांची वादळी बैठक झाली. या बैठकीनंतर तृणमूल नेते, खासदार डेरेक ओब्रायन यांनी, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी आपल्याला ‘चालते व्हा’ म्हटले असा दावा करून आयोगावर आरोपांची राळ उडवली.

सविस्तर वृत्त... फ्रंट पेज २