अत्यावश्यक असल्यासच कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती

महाराष्ट्र टाइम्स

महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी कामगार विभागाला कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत नवीन आदेश दिले आहेत. विभागप्रमुखांकडून मागणी आल्यास आणि गरज अत्यावश्यक असल्यासच भरती केली जाईल. कंत्राटी कर्मचाऱ्यांना आर्थिक जबाबदारी दिली जाणार नाही. चार एजन्सींमार्फत कुशल, अकुशल आणि अर्धकुशल कर्मचाऱ्यांची भरती होईल. आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्याचेही आदेश दिले आहेत.

municipal corporations contractual recruitment only when necessary

‘विभागप्रमुखांकडून मनुष्यबळाची मागणी आल्यास आणि अत्यावश्यक असल्यासच कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करा,’ असे आदेश महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी कामगार विभागाला दिले आहेत.

अमोल येडगे यांनी कामगार विभागाचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी बारीकसारीक माहिती जाणून घेतल्याचे सुत्रांनी सांगितले. आर्थिक जबाबदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांना न देता अन्य जबाबदारी त्यांना त्या असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. कंत्राटी पध्दतीने (बाह्यस्त्रोत) मनुष्यबळ पुरवण्यासाठी महापालिकेने चार एजन्सींना नियुक्त केले आहे. या एजन्सींच्या माध्यमातून कुशल, अकुशल आणि अर्धकुशल अशा तीन श्रेणींमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. विभागप्रमुखांच्या मागणीनुसार कंत्राटी कर्मचारी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनावर संबंधित एजन्सीला ३.८५ या दराने कमिशन दिले जाणार आहे. आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी ही माहिती आयुक्तांना दिली.

यावर आयुक्तांनी कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्याचे आदेश कामगार विभागाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. गरज असेल आणि विभागप्रमुखांनी मागणी केली असेल, तरच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरती करा, त्यांना आर्थिक अधिकार देऊ नका असे स्पष्ट आदेश देखील त्यांनी दिले.