पदभरतीच्या अर्जांची छाननी

महाराष्ट्र टाइम्स

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी अर्ज छाननी सुरू आहे. ७३ जागांसाठी ४९२१ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. शैक्षणिक पात्रता, अध्यापन आणि संशोधन कार्याला ६० टक्के गुण दिले जातील. अध्यापन कौशल्य चाचणीसाठी २० टक्के आणि मुलाखतीसाठी २० टक्के गुण असतील. पात्र अपात्र यादी लवकरच जाहीर केली जाईल.

professor recruitment at dr babasaheb ambedkar marathwada university screening process for applications commenced

पदभरती प्रक्रियेत मानव्यविद्या, वाणिज्यशास्त्र, आंतरविद्याशाखा व विज्ञान-तंत्रज्ञान या चारही विद्याशाखांतील जागांचा समावेश आहे. यामध्ये प्राध्यापक प्रवर्गातील आठ, तर सहयोगी प्राध्यापक पदाच्या १२ जागांचा समावेश आहे. तर सहायक प्राध्यापकांच्या ५३ जागा आहेत. ५३ जागांसाठी आलेल्या अर्जांची संख्या सर्वाधिक आहे. छाननीनंतर पात्र व अपात्र अर्जदारांची यादी जाहीर केली जाणार आहे. यादीवर आक्षेप मागविले जातील. त्यांची सुनावणी होऊन अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. नवीन कार्यपद्धतीनुसार सार्वजनिक विद्यापीठांमधील (अकृषी) अध्यापकांच्या भरती प्रक्रियेच्या निवडीचे सूत्र ६०:२०:२० असे आहे. शैक्षणिक आणि संशोधन पात्रता ६० टक्के गुणांकन राहील. अध्यापन कौशल्य चाचणीसाठी २० टक्के गुणांकन राहील, तर २० टक्के गुणांकन मुलाखतीला असणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ७३ पदांसाठी आलेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू झाली आहे. पदनिहाय छाननीसाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आल्या आहेत.

राज्य शासनाने सार्वजनिक विद्यापीठातील अध्यापकांच्या निवड प्रक्रियेबाबत ११ फेब्रुवारी रोजी सुधारित कार्यपद्धती जाहीर केली होती. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने परिसर, उपपरिसरातील शैक्षणिक विभागांमधील ७३ प्राध्यापकांच्या रिक्त जागांसाठी प्रक्रिया सुरू केली. सुधारित कार्यपद्धतीनुसार ‘ शैक्षणिक पात्रता , अध्यापन व संशोधन कार्य’ (एटीआर) सादर करणे, नव्याने अर्ज करण्यास पुन्हा मुदत देण्यात आली. २५ मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ४९२१ उमेदवारांनीच ऑनलाइन ‘एटीआर’ सादर केला. त्यानंतर अनेक उमेदवारांनी हार्ड कॉपी विद्यापीठात प्रत्यक्ष सादर केल्या तर काहींनी टपालाद्वारे सादर केल्या. या अर्जांच्या हॉर्ड कॉपी आल्यानंतर संबंधित कक्षांकडून अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू आहे. छाननीसाठी समित्या नियुक्त करण्यात आल्या. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी छाननीचा आढावा घेतला.

एप्रिल अखेरपर्यंत अर्ज छाननी सुरू राहिल. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल. नवीन कार्यपद्धतीनुसार सार्वजनिक विद्यापीठांमधील (अकृषी) अध्यापकांच्या भरती प्रक्रियेच्या निवडीचे सूत्र ६०:२०:२० असे आहे. शैक्षणिक आणि संशोधन पात्रता ६० टक्के गुणांकन राहील. अध्यापन कौशल्य चाचणीसाठी २० टक्के गुणांकन राहील, तर २० टक्के गुणांकन मुलाखतीला असणार आहे.