एमआयएलद्वारे १.३५ कोटींची मदत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
mihan india limited announces aid of 135 crores
नागपूर : मिहान इंडिया लिमिटेडतर्फे (एमआयएल) सामाजिक बांधीलकीअंतर्गत विविध लोकहिताच्या उपक्रमांसाठी १ कोटी ३५ लाख रुपयांच्या सीएसआर निधीचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी ‘रामगिरी’ येथे विविध संस्था आणि नागपूर महापालिकेला धनादेश प्रदान करण्यात आले. जीविका फाउंडेशनला सर्व्हायकल कॅन्सर लसीकरण अभियानासाठी २५ लाख रुपये देण्यात आले. नागपूर महापालिकेला सांडपाणी व्यवस्थापनासाठी ३५ लाख रुपये, महिला सक्षमीकरण प्रकल्पासाठी ३५ लाख रुपये आणि वृक्षारोपणासाठी १० लाख रुपयांचा निधी देण्यात आला. वूमन्स एज्युकेशन सोसायटी, नागपूरच्या महाविद्यालयीन इमारत व सभागृह नूतनीकरणासाठी ३० लाख रुपयांचा निधी देण्यात आला. या निधीमुळे आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि नागरी सुविधांच्या विकासाला हातभार लागणार आहे. यावेळी महापौर नीता ठाकरे, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी-वखरे, गटनेते नरेंद्र ऊर्फ बाल्या बोरकर यांच्यासह एमआयएलचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.