विशाखा राऊत यांना धक्का

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
possibility of vishakha rauts councilor position being revoked
(पान एकवरून)

करण्यात आली होती. या तक्रारीवर निर्णय देताना समितीने राऊत यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले.
राऊत यांचा जन्म मुंबईत झाला असून, त्यांचे मूळ गाव पालघर जिल्ह्यातील आहे. त्यांनी वडील आणि आजोबांच्या नोंदींच्या आधारे पालघर येथून ओबीसी प्रमाणपत्र मिळवले होते. मात्र, हे प्रमाणपत्र ग्राह्य धरता येत नसल्याचा निर्णय समितीने दिला आहे. रद्दबातल प्रमाणपत्राची प्रत येत्या सोमवारी मुंबई महापालिकेकडे येण्याची शक्यता आहे.

राऊत यांचे नगरसेवकपद रद्द झाल्यास प्रिया सरवणकर यांना संधी मिळू शकते, अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. याआधी भांडुपमधील प्रभाग क्रमांक १११चे शिवसेना (उबाठा) पक्षाचे नगरसेवक दीपक सावंत यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले होते. त्यानंतर महापालिका सभागृहात त्यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली होती.

विशाखा राऊत यांनी कुणबी जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जासोबत दाखल केलेले प्रतिज्ञापत्र, इतर कागदपत्रे आणि सादर केलेल्या कुणबी जात वैधता प्रमाणपत्रधारकांशी रक्तनातेसंबंध सिद्ध करता आलेले नाहीत, असे आदेशात म्हटले आहे.

संख्याबळावर परिणाम

मुंबई महापालिकेत शिवसेना (उबाठा) पक्षाचे ६५ नगरसेवक होते. दीपक सावंत यांचे पद रद्द झाल्यानंतर हे संख्याबळ ६४वर आले. आता विशाखा राऊत यांचे नगरसेवकपदही रद्द झाल्यास पक्षाचे संख्याबळ आणखी कमी होऊ शकते.