Nagpur sharjah Flight Delayed By One And A Half Hours
नागपूर-शारजाह सव्वा तास उशिरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नागपूर : एअर अरेबियाच्या नागपूर-शारजाह विमान ाने शुक्रवारी नियोजित वेळेपेक्षा सुमारे सव्वा तास उशिराने उड्डाण केले. त्यामुळे प्रवाशांना पहाटे नागपूर विमानतळावर अतिरिक्त प्रतीक्षा करावी लागली. एअर अरेबियाचे जी-९४१६ हे नागपूर-शारजाह विमान सकाळी ५ वाजता रवाना होणे अपेक्षित होते. मात्र, विमानाने सकाळी ६.१५ वाजता विमानतळावरून शारजाहच्या दिशेने उड्डाण घेतले. या विलंबामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. यापूर्वीही एअर अरेबियाच्या काही विमानांना विलंब झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याबाबत एअरलाइनकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही.