The Real History Of Partition An Important Discussion For Our Generation
‘फाळणीचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नागपूर : स्वातंत्र्याच्या वेळी झालेल्या भारताच्या फाळणीचा प्रामाणिक इतिहास लोकांसमोर खऱ्या अर्थाने मांडला गेला नाही. तो आजच्या पिढीपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ संपादक सुधीर पाठक यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय वाचनालय आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे आयोजित ‘अखंड भारत दिवस’ कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. मंचावर वाचनालयाचे अध्यक्ष पद्मश्री तांबेकर, उपाध्यक्ष सतीश भारत, सावरकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे आणि महासचिव अनिल देव उपस्थित होते. ‘‘नर्मदे सिंधू कावेरी...’ असे आपण म्हणतो; पण सिंधू नदी भारतात येत नाही तोपर्यंत हिंदुस्थान अपूर्ण आहे’, असे अध्यक्षीय मनोगतात पद्मश्री तांबेकर म्हणाले. प्रास्ताविक चंद्रकांत लाखे, संचालन अनिल देव यांनी केले. राजेंद्र बेनोडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार-साहित्यिक प्रकाश एदलाबादकर, प्राचार्य डॉ. अजय कुलकर्णी, शिरीष दामले, बापू कांबळे, ग्रंथपाल सुनील बोरकर, वीरेंद्र देशपांडे, दिनेश खुरगे, अनघा पेंडके, विनोद बांगडकर, अशोक दुर्गे, सुरेश बागडदेव, उदय काळे, प्रतिभा तांबेकर, प्रसाद पोफळी, हितेंद्र ठाकरे, प्रकाश पाटील, महेंद्र हारोडे तसेच वाचनालयाचे वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.