‘आपली बस’ कर्मचाऱ्यांनी दिला संपाचा इशारा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
nagpur aapli bus employees signal strike service to halt from september 7
नागपूर : मनपाच्या ‘आपली बस’ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याचा आरोप करीत शिवसेनेचे नितीन तिवारी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यास ७ सप्टेंबरपासून सेवा बेमुदत बंद ठेवून संप पुकारण्यात येईल, असा निर्णय रविवारी मोरभवनातील बैठकीत झाला. बैठकीला कमलेश त्रिपाठी, संजय सिंह, मनोज शुक्ला, मुन्ना तिवारी, ललित बावनकर आदी उपस्थित होते.