नाशिकच्या दिलीपला दुसरे सुवर्ण

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नाशिकच्या दिलीपला दुसरे सुवर्ण
नागोया : नाशिकच्या दिलीप गावितने आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्या दिवशी सुवर्णपदकावर नाव कोरले. कोपरापासून उजवा हात नसलेल्या दिलीपने बुधवारी १०० मीटर शर्यत जिंकली होती. त्यापाठोपाठ त्याने गुरुवारी ४०० मीटर शर्यतही जिंकली होती. याच वर्षी झालेल्या राष्ट्रकुल पॅरा क्रीडा स्पर्धेतही दिलीपने १०० मीटर शर्यत जिंकली होती.

पदकांचे अर्धशतक
पॅरा ॲथलेटिक्समध्ये भारताने पदकांचे अर्धशतक साजरे केले. भारताने आतापर्यंत स्पर्धेत २१ सुवर्ण, २६ रौप्य आणि ४१ ब्राँझ अशी एकूण ८८ पदके मिळवली आहेत. त्यात ॲथलेटिक्समधील ५२ पदकांचा समावेश आहे. पॅरा ॲथलेटिक्समध्ये भारताने १८ सुवर्ण, १६ रौप्य आणि १८ ब्राँझपदके मिळवली आहे. उर्वरित दोन सुवर्णपदके तिरंदाजीतील आणि एक सुवर्ण पॅरा नेमबाजीतील आहे. भारत पदकतक्त्यात चौथ्या स्थानावर आहे. चीन १५० सुवर्ण, ७९ रौप्य आणि ५५ ब्राँझ अशा एकूण ३१४ पदकांसह अव्वल स्थानी आहे. जपान ४० सुवर्ण, ४६ रौप्य, ५० ब्राँझपदकांसह दुसऱ्या, तर उझबेकिस्तान ३८ सुवर्ण, ४१ रौप्य आणि ४१ ब्राँझपदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.