Possibility Of Residing Right Being Revoked Due To Encroachment
तर निवासाचा हक्क होणार बाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
(पान एकवरून)
(पान एकवरून) आहे, सरकारी, महापालिका किंवा खासगी जमिनींवर अतिक्रमण करून बेकायदा झोपड्या उभारल्यानंतर मोफत घराचा लाभही घ्यायचा आहे, जागीच पुनर्वसनाची मागणीही करायची आहे; कायदा आणि नियम पाळायचे नाहीत, असे कसे चालू शकेल’, अशी कठोर टिप्पणी खंडपीठाने केली. पीएएए करारनाम्याचा हक्क काढून घेण्यासह अशा प्रकरणांत कोणती कायदेशीर कारवाई करता येऊ शकते, याचा विचार करण्यासाठी खंडपीठाने एसआरए प्राधिकरणाची बाजू मांडण्याकरिता ॲड. बिरेंद्र सराफ यांची नियुक्ती केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.‘नागरिकांमध्ये स्वच्छतेचे आचरण बिंबायला हवे आणि त्यांना ओला व सुका कचरा वेगळा गोळा करण्यास प्रोत्साहन द्यायला हवे, असे आम्ही पूर्वीच्या आदेशात म्हटले होते. त्याप्रमाणे कोणती कार्यवाही झाली? नगरसेवकांचे साहाय्य घेतले का? असे प्रश्न खंडपीठाने सुनावणीदरम्यान उपस्थित केले.