Sakshi Chandak Secures First Rank In Ca Intermediate Exam Nationwide
नाशिकची साक्षी देशात प्रथम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नाशिक : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियामार्फत ( आयसीएआय ) घेण्यात आलेल्या सीए इंटरमिजिएट सप्टेंबर २०२६ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये नाशिकच्या साक्षी चांडक या विद्यार्थिनीने ५०२ गुणांसह देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
गेल्या वर्षी झालेल्या सीए फाउंडेशन परीक्षेतही तिने देशात चौथा क्रमांक पटकावला होता. साक्षीसोबत मुंबईच्या नील शाहनेही सीए इंटरमिजिएट परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. देशात एकूण १४,८१८ विद्यार्थी सीए इंटरमिजिएट उत्तीर्ण झाले आहेत. सविस्तर वृत्त...२