पार्वता खडतकर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पार्वता खडतकर
आशीर्वादनगर येथील रहिवासी पार्वता वासुदेव खडतकर (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सोमवारी, सकाळी ९ वाजता मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात मुले अरविंद, अनिल, मुलगी मनीषा बाविस्कर आणि मोठा आप्तपरिवार आहे.

सुनंदा सहस्रभोजनी
‘झेप’, ७१, शंकरनगर, नागपूर येथील सुनंदा सहस्रभोजनी (वय ७६) यांचे रविवारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानाहून अंबाझरी घाट येथे जाईल. त्यांच्यामागे पती अनिल, मुलगा अंशुमन, अपूर्वा पाचपोर आणि संहिता पेंढारकर या मुली, सून रश्मी व मोठा आप्तपरिवार आहे.

तुळसाबाई देवळे

श्री क्षेत्र शेंदुरजना बाजार येथील तुळसाबाई सूर्यभान देवळे (वय ९३) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे ओंकार, गोपाल, रमेश, राजू ही मुले, माला, शीला या मुली व मोठा आप्तपरिवार आहे.