Revolution Of Indigenous Technology In Indias Space And Defense Sector
अंतराळ, संरक्षण क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञानाला बळ
महाराष्ट्र टाइम्स•
भारताच्या अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रातील वाढत्या क्षमतेला अधिक गती देण्यासाठी नागपूरस्थित स्पेसव्हर्स टेक्नॉलॉजीज आणि नॅशनल अकॅडमी ऑफ डिफेन्स प्रॉडक्शन (एनएडीपी) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.
एनएडीपी ही संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम असलेल्या म्युनिशन्स इंडिया लिमिटेडची प्रमुख संस्था आहे. या करारांतर्गत दोन्ही संस्था अंतराळ आणि एरोस्पेस तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी एकत्र काम करतील. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञ यांच्यात थेट संवाद व सहकार्य वाढविण्यात येईल. म्युनिशन्स इंडिया लिमिटेडअंतर्गत एनएडीपी आता नवनवीन क्षेत्रे आणि संधींचा शोध घेत आहे. उद्योजक राजेश मुनेश्वर यांच्या नेतृत्वाखालील स्पेसव्हर्स टेक्नॉलॉजीज ही संस्था अंतराळ अभियांत्रिकी आणि स्वदेशी क्षमता निर्मितीवर लक्ष केंद्रित करत आहे.