Khardi kasara Third Route Inauguration Of Modern Railway Track
खर्डी-कसारादरम्यान तिसरा मार्ग सुरू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
(पान एकवरून)
(पान एकवरून)१७ आणि १८ ऑक्टोबरला मार्गाची पाहणी केली. बांधकामाचा दर्जा, ट्रॅकची स्थिती आणि सुरक्षाविषयक कामांवर समाधान व्यक्त केले. या मार्गावर ताशी ११७ किमी वेगाने रेल्वेची यशस्वी चाचणी घेण्यात आली. प्रत्यक्षात १०० किमी वेगाने रेल्वे गाड्या चालवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
प्रकल्पांतर्गत डोंगराळ भागात नवीन विद्युतीकृत रेल्वेमार्ग उभारण्यासह पुलांचे बळकटीकरण आणि विस्तार, मोठ्या प्रमाणावरील मातीकाम, आधुनिक सिग्नल यंत्रणा आणि विद्युतीकरणाची कामे करण्यात आली. खर्डी आणि कसारा रेल्वे यार्डांमध्येही आवश्यक सुधारणा करण्यात आल्या. कमीत कमी वाहतूक बाधित होईल यासाठी रात्रकालीन ब्लॉकमध्ये मोठ्या प्रमाणात कामे पूर्ण करण्यात आली.