‘सरकारबदलाने सुधारणा नाही’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘सरकारबदलाने सुधारणा नाही’
(पान एकवरून)

त्यांची पत्नी डॉ. सुदेश धनखड, भारतातील इस्त्रायलचे महावाणिज्यदूत यानिव रेवाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदींची उपस्थिती होती.
भाषणाचे मोदींकडून कौतुक

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाची प्रशंसा केली आहे. ‘परमपूज्य सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नागपुरातील शताब्दी वर्ष विजयादशमी उत्सवादरम्यान अत्यंत प्रेरणादायी भाषण केले’, असे मोदी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये नमूद केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त सर्व स्वयंसेवकांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आणि या संघटनेने सेवा, राष्ट्रनिर्माण आणि सामाजिक सलोख्याचे उल्लेखनीय शतक पूर्ण केले आहे, असेही मोदी यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

राहुल गांधी यांची टीका

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकास्त्र सोडले. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या संघाची विचारधारा घटनाविरोधी असून स्त्रिया या पुरुषांची मालमत्ता असल्याचे त्यांना वाटते, अशी जहरी टीका गांधी यांनी केली. आपण स्वतः शिवशक्तीवर विश्वास ठेवणारे असल्याने संघावर टीका करण्यात आनंद वाटतो, असेही राहुल यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये नमूद केले आहे.