तीच गर्दी, तोच उत्साह

Contributed by: म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
shiv sena dussehra rally 2023 grand gathering and excitement
अवघ्या काही महिन्यांपूर्वी सहा खासदारांनी पक्षाची साथ सोडली, पक्षचिन्हाचा खटला दोन वर्षांहून अधिक काळापासून सुरू असला तरी मंगळवारी शिवसेना उबाठा पक्षाच्या दसरा मेळाव्याला शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याचा जोश, उत्साह तिथे दिसत होता.

या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार का, जेन झी आंदोलनात अलिकडेच उतरलेले उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश करणार का, याविषयी शिवसैनिकांमध्ये कमालीची उत्सुकता असल्याचे चित्र शिवाजी पार्कवर होते. तसेच, अवघ्या काही दिवसांपूर्वीच ठाण्यातील पक्षाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या झालेल्या हत्येविषयी शिवसैनिकांमध्ये असंतोष असल्याचे चित्र दिसले.
कैलास पाटील यांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील भाषणाला चांगला प्रतिसाद मिळाला तर सुषमा अंधारे यांच्या टीकात्मक भाषणाला उपस्थितांची दाद मिळाली. नितीन बानगुडे-पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या काळातील प्रसंगांचा दाखला देत शिवसैनिकांमध्ये उत्साह भरला.