Shutdown Of Water Supply In Several Areas Of Nagpur On Tuesday
मंगळवारी काही भागांत कमी पाणी
महाराष्ट्र टाइम्स•
पेंच-३ जलशुद्धीकरण केंद्रातील कॉमन डिस्चार्ज हेडर पाइपलाइनमधील गळती दुरुस्ती तसेच विविध विद्युत आणि यांत्रिक दुरुस्तीची कामे करण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटरकडून (ओसीडब्ल्यू) १ सप्टेंबर, मंगळवारी सहा तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. सकाळी १० ते दुपारी ४ या कालावधीत पेंच-३ जलशुद्धीकरण केंद्र बंद राहणार असल्याने शहरातील अनेक भागांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
या कालावधीत पाइपलाइनमधील गळती दुरुस्तीबरोबरच पेंच-३ केंद्रावरील आवश्यक विद्युत आणि यांत्रिक देखभालीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे संबंधित भागांतील नागरिकांनी शटडाऊनपूर्वी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा-ओसीडब्ल्यूकडून करण्यात आले आहे. लक्ष्मीनगर जुने सीए, रामनगर जीएसआर सीए, सेमिनरी ईएसआर सीए, रायफल लाइन, सिव्हिल लाइन्स डीटी या जलकुंभांवरून विविध वस्त्यांना होणारा पाणीपुरवठा बाधित राहील.