महासागरातील हिंदोळे

Contributed byसमीर कर्वे|महाराष्ट्र टाइम्स

भारताने हिंदी महासागरात आपले नौदल सामर्थ्य दाखवले आहे. विशाखापट्टणम येथे झालेल्या नौदल संचलनात अनेक देशांच्या युद्धनौका सहभागी झाल्या. पाकिस्तान आणि चीनला निमंत्रण नव्हते. स्वदेशी बनावटीची 'आयएनएस विक्रांत' आकर्षणाचे केंद्र ठरली. भारताकडे आता हिंदी महासागरात प्रथम प्रतिसाद देणारी सागरी शक्ती म्हणून पाहिले जाते. सागरी सुरक्षेतील आव्हानांवरही चर्चा झाली.

महासागरातील हिंदोळे
अरबी समुद्रात आणि हिंदी महासागरात सध्या अनेक घडामोडी सुरू आहेत. भारताने जागतिक लाटांवर स्वार होत आपली ताकद दाखवली आहे, तर दुसरीकडे मुंबईत नौदल तळाजवळ नागरी इमारतींनी रडारला चकवा देत डोके वर काढले आहे. विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलाचा आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलन सोहळा नुकताच पार पडला, ज्यामध्ये १९ देशांच्या आणि भारतीय नौदलाच्या ६० युद्धनौकांचा सहभाग होता. पाकिस्तान, चीन आणि तुर्किये यांना या सोहळ्याचे निमंत्रण नव्हते, तर जर्मनी, फिलिपाइन्स आणि संयुक्त अरब अमिरातीचा सहभाग लक्षवेधी ठरला. अमेरिकेची अनुपस्थितीही चर्चेचा विषय ठरली. या सोहळ्यात 'आयएनएस विक्रांत' या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हिंदी महासागरात भारताची 'प्रथम प्रतिसाद देणारी सागरी शक्ती' म्हणून ओळख अधोरेखित झाली.

विशाखापट्टणम येथे नुकत्याच पार पडलेल्या भारतीय नौदलाच्या आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलन सोहळ्यात १९ देशांच्या आणि भारतीय नौदलाच्या ६० युद्धनौका सहभागी झाल्या. हा सोहळा 'मैत्रीचा सेतू' या संकल्पनेवर आधारित होता. सन २००१ मध्ये या सोहळ्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप मिळाले. या वर्षीच्या सोहळ्यात पाकिस्तान, चीन आणि तुर्किये यांना निमंत्रण नव्हते. मात्र, जर्मनी, फिलिपाइन्स आणि संयुक्त अरब अमिरातीचा सहभाग लक्षवेधी ठरला. अमेरिकेची अनुपस्थितीही चर्चेचा विषय ठरली. या सोहळ्यात 'आयएनएस विक्रांत' या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २०१६ च्या संचलन सोहळ्यात रशियन बनावटीची 'आयएनएस विक्रमादित्य' आणि ब्रिटिश बनावटीची 'आयएनएस विराट' सहभागी होत्या. या वर्षी भारतीय गोद्यांमध्ये तयार झालेल्या आणि ब्रह्मोससारख्या स्वदेशी क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्यांचाही समावेश होता. यावरून हिंदी महासागरात 'प्रथम प्रतिसाद देणारी सागरी शक्ती' म्हणून भारताकडे पाहिले जाते, हे स्पष्ट होते.
हिंदी महासागरात विविध देशांच्या संयुक्त आरमारी सुरक्षा प्रशिक्षण व कृती दलाचे म्हणजेच कम्बाइन्ड टास्क फोर्स १५४ चे नेतृत्व अलीकडेच भारताकडे आले आहे. विशेष म्हणजे, शौर्यचक्र सन्मानित मराठी नौसेनानी कमोडोर मिलिंद मोकाशी यांच्याकडे ही धुरा आहे. सागरी संचलन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर्व किनारपट्टीवर 'मीलन २०२६' हा विविध देशांमधील संयुक्त आरमारी युद्धसराव सुरू झाला आहे, जो २५ फेब्रुवारी रोजी संपेल. गेल्या काही वर्षांत भारताने अमेरिकी नौदल (मलबार), ब्रिटिश नौदल (कोकण), फ्रेंच नौदल (वरुण) आणि इतर अनेक विदेशी नौदलांबरोबर संयुक्त युद्धसराव सुरू ठेवले आहेत.

रविवारी गोव्यात हिंदी महासागरातील आव्हानांवर चर्चा करण्यासाठी विविध देशांच्या वरिष्ठ नौदल अधिकाऱ्यांची एक संयुक्त परिषदही पार पडली. या परिषदेत संशोधनाच्या नावाखाली समुद्रात सुरू असलेला गुप्त संचार आणि आपली ओळख लपवून छोट्या बोटींची होणारी घुसखोरी यावर सखोल चर्चा झाली. एकूणच, भारताची सागरी ताकद सर्वांनी ओळखली असली तरी, आपली ओळख लपवून समुद्रातून येणाऱ्या शत्रूचा धोका सर्वांनाच सतावतो आहे.

गेल्या दोन वर्षांतील बदललेली भू-राजकीय परिस्थिती , अमेरिकेची भूमिका, चीन-पाकिस्तान आणि तुर्किये यांचे संबंध या पार्श्वभूमीवर कदाचित भारत सरकारने या संचलन सोहळ्याला मोठे स्वरूप दिले नसावे. मात्र, एक गोष्ट निश्चित आहे की, आरमारी धोक्यांचा उगम केवळ समुद्रातून होत नाही. त्यांना किनारपट्टी आणि जमिनीवरूनही खतपाणी मिळते. त्यामुळे पश्चिम तटावरील कमांडच्या क्षेत्रात नौदलाच्या हेलिकॉप्टर तळाजवळ एखादी नागरी इमारत अडथळा ठरत असेल, तर त्यावरही बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. केवळ इतर नागरी यंत्रणांकडे बोट दाखवून चालणार नाही. खोल समुद्रातील लाटांइतकेच उथळ पाण्यातील धोक्यांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.