Akola Agriculture Officers Anger Farmers Facing Issues Due To Poor Soybean Seeds
कृषी अधिकाऱ्यांना अकोल्यात कोंडले
महाराष्ट्र टाइम्स•
अकोला जिल्ह्यात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. मागील आठ दिवसांत २००पेक्षा जास्त तक्रारी प्राप्त झाल्या असतानाही कारवाई केली जात नसल्यावरून संतप्त माजी आमदार अमोल मिटकरी यांनी अकोला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात धाव घेतली. अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांना त्यांच्या दालनामध्ये दोन तास कोंडले होते.
अकोला जिल्ह्यात आठ ते दहा खासगी कंपन्यांचे बियाणे निकृष्ट निघाले आहेत. तक्रार करूनही कृषी अधीक्षकांकडून शेतकऱ्यांसाठी कुठलीही मदत करण्यात आली नाही. संबंधित बियाणे कंपन्यांवर कुठलीही कार्यवाही नाही. शेतकऱ्यांना खात्रीचे दुसरे बियाणे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली नाही.