कलाकारांनी केले कौतुक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
resignation of education minister artists appreciate
मुंबई : शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या धर्मेंद्र प्रधान यांच्या निर्णयाचे मनोरंजनविश्वातील अनेकांनी स्वागत केले. हा आंदोलक विद्यार्थ्यांचा विजय आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

विजय वर्मा, वीर दास, स्वरा भास्कर , वरुण ग्रोवर यांच्यासह अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. कॉमेडियन-लेखक वरुण ग्रोवर यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. आज सत्ताधाऱ्यांना माघार घ्यावी लागली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. वीर दास यांनी ‘फ्रेंड्स’ या कॅप्शनसह एक फोटो शेअर केला.