मगरीची सुटका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
daring rescue of crocodile in mumbai swift action by forest department
मुंबई : मुंबई आयआयएमच्या भानशीला पाड्यामध्ये गुरुवारी मध्यरात्री १ वाजता भर रस्त्यावर एका मगरीचे दर्शन झाले. ही मगर सुमारे साडेआठ फुटांची होती. वन विभाग आणि वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशन (डब्ल्यूडब्ल्यूए) यांनी तिची सुटका केली. त्यानंतर तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

ही मगर रस्त्यावरून फिरत असल्याची माहिती भानशीला पाड्यातील स्थानिकांनी वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशनला दिली. वन विभागाने बचाव मोहिमेला परवानगी दिली आणि मग या मगरीला सुरक्षित पकडण्यात आले. डॉ. जया चारियार आणि डॉ. वीरराघवन चारियार यांनी मगरीची वैद्यकीय तपासणी केली. मगर पूर्णपणे निरोगी असल्याचे घोषित करण्यात आले. ही मगर प्रौढ मादी होती. तिला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.